लोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले

 

लोणावळ्यात इंदौर-दौंड एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले


मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

लोणावळा: लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदौर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरत दुर्घटना घडली आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गेल्या एक तासापासून प्रवासी अडकून पडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर डबे रुळावर आणण्याचं काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणे आठच्या सुमारास इंदौर-दौंड या एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले. यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनांकडून घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. एक्स्प्रेस लोणावळा रेल्वे स्थानकात येत असताना दुर्घटना घडल्याची तेथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments