काव्यपुष्प
काव्यपुष्प
आमचा शिवबा...
सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला
मायभूमीच्या सेवेसाठी शिवबा आमचा झुंजला || धृ. ||
शिवनेरीवर सिंह जन्मला, आम्हा रयतेचा वाली
जिजाऊचा छावा लढला, करूनी हाताच्या ढाली
या मातीचे पांग फेडण्याचा 'जाणता राजा' अवतरला.
सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला || १. ||
तलवारीच्या टोकावरती महाराष्ट्राची शान राखली
शक्ती आणिक युक्तीने शत्रूंनाही धुळ चाखली
दरीदरीतून बोल उमटले मुलुख अवघा दुमदुमला
सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला || २. ||
मर्दुमकीची शर्थ इथे ही मर्द मावळा भिडला
गनिमी कावा करून जिंकला गड कोटी वसला
थरथरली ती मोगलशाही ध्वज हिंदवी फडफडला
सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला || ३. ||
सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला
मायभूमीच्या सेवेसाठी शिवबा आमचा झुंजला.
सतिश कोंडू खरात
वाशिम
९४०४३७५८६९
--------------------------------------
साथिया
ज़िंदगी भर साथ निभाना साथिया
पूरी ज़िंदगी की है तेरे नाम साथिया
अपनी मांग में सिंदूर भर कर सात
फेरो का वचन है निभाना साथिया
सफ़र बहोत लंबा है मुझे तेरा हाथ
पकड़ कर साथ चलना है साथिया
कभी ख़ुदसे अलग न करना ताउम्र
तेरी नज़रों में कैद रहना है साथिया
हमें इतने पास रखना तेरे दिल की
धडकनों से बातें कर सके साथिया
तुम्हारी चाहत ही हमारी बंदगी है
इसे कभी न भुलाना मेरे साथिया
नीक राजपूत
9898693535
-------------------------------------
..प्रभा..
प्रकाशले नभांगण
फुलल्या दिशा दाही,
प्रभा शृंगारली हसरी
घेऊन चैतन्य नवलाई.
..नखाते ज्ञानेश्वर..
.परभणी.
-------------------------------------
शब्दगंध..
जाणावे भावनांचे मोल
हरवू नये मोठें पणात
नवे नाते जुळत असते
आयुष्याच्या वळणात
✍️
सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.
----------------------------------
रवी नभीचा
चैतन्यदायी असे
आनंदी दिसे
सूर्य किरणे
देई जीवना अर्थ
सकल व्यर्थ
हर्ष पेरीत
सृष्टीला न्याहळतो
मनी वसतो
सौ उषा राऊत
------------------------------
चारोळी
माणूस पण किती चिवट
वाट्टेल ते होवो, जगत राहतो
उजाडणारा प्रत्येक दिवस
जगण्याचं बळ देतो
सौ. हेमा जाधव, सातारा

Comments
Post a Comment