राज्य नाट्य स्पर्धेला ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ यांचे नाव
राज्य नाट्य स्पर्धेला ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ यांचे नाव
केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
काळाच्या पुढे असलेल्या आणि मराठी रंगभूमीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने आता राज्य नाट्य स्पर्धा ओळखली जाईल. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी या संदर्भातील घोषणा के ली.
केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह ‘संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र’चे प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबे, प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे आदी अधिकारी उपस्थित होते. केशवराव भोसले यांच्या जयंती, पुण्यतीथीनिमित्त सरकारी पुढाकाराने कार्यक्रम करण्यात यावे, याबाबत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्यात येणार आहे. केशवराव भोसले यांच्या नावाने कला, साहित्य आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याबाबतही विभागामार्फत विचार करण्यात येईल.
होणार काय?
केशवराव भोसले यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकारांसाठी राज्य पुरस्कार सुरू करण्याबाबत शासन विचार करीत आहे. तत्पूर्वी सांस्कृतिक परिषदेने परिपूर्ण प्रस्ताव, मार्गदर्शक तत्त्वे सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करावी. संगीत नाटक क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याबाबतही विचार करण्यात येईल.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा