गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते कुडाळ वातानुकूलित रेल्वे


गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते कुडाळ वातानुकूलित रेल्वे

Advertisement

गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते कुडाळ वातानुकूलित रेल्वे


गाडीचे आरक्षण ४ सप्टेंबरपासून उपलब्ध होईल.


मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र मांक ०१२६९ वातानुकूलित गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७ ते १० सप्टेंबर रोज ०४.३५ वाजता सुटेल आणि कुडाळला त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता (१४.३०) पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२७० वातानुकूलित गाडी कुडाळ येथून या तारखांना दुपारी साडेतीन वाजता (१५.३०) सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पोहोचेल. या गाडीला  ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वार रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकात थांबा देण्यात आला आहे.  या गाडीचे आरक्षण ४ सप्टेंबरपासून उपलब्ध होईल.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या