सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक शपथविधी!

 


सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक शपथविधी!

सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक शपथविधी!


प्रथमच नऊ न्यायाधीशांना एकाच वेळी पदभार


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या नऊ न्यायाधीशांना मंगळवारी झालेल्या सोहळ्यात या पदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे आता या न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ झाली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच नऊ न्यायाधीशांनी एकाच वेळी न्यायाधीशपदाची शपथ घेतली.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आता ३३ झाली असून ज्या नऊ न्यायाधीशांना शपथ देण्यात आली त्यात न्या. अभय श्रीनिवास ओक, न्या. विक्रम नाथ, न्या. जितेंद्र कुमार, न्या. माहेश्वरी, न्या. हिमा कोहली व न्या. बी.व्ही नागरत्ना यांचा समावेश आहे. या शिवाय न्या. सी. टी. रविकुमार, न्या. एम. एम. सुंदरेश, न्या. बेला एम त्रिवेदी , न्या. पी. एस. नरसिंह यांनाही शपथ देण्यात आली.

न्या. नागरत्ना या माजी सरन्यायाधीश इ. एस व्यंकटरामय्या यांच्या कन्या असून त्या २०२७ मध्ये सरन्यायाधीश होऊ शकतील. पण त्यांचा सरन्यायाधीशपदाचा काळ तुलनेत कमी असेल.  न्या. नाथ, न्या. नरसिंह हेही सरन्यायाधीशपदाच्या रांगेत आहेत. पारंपरिक पद्धतीत न्यायाधीशांचा शपथविधी हा सरन्यायाधीशांच्या कक्षात होत असे, पण या वेळी तो शेजारच्या इमारतीतील सभागृहातील कक्षात घेण्यात आला. कोविड नियमांचे पालन करून हा शपथविधी घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेली नेमणूक पत्रे या वेळी वाचून दाखवण्यात आली. न्या. नाथ यांच्यानंतर न्या. नागरत्ना यांना एक महिन्याचा काळ सरन्यायाधीशपदी मिळण्याची शक्यता आहे. न्या. नरसिंहा हे नंतर न्या. नागरत्ना यांची जागा घेऊ शकतील. त्यांचा कार्यकाळ सहा महिने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या न्यायाधीशांच्या नावाची शिफारस १७ ऑगस्टला केली होती.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

 

Comments