देशात लवकरच मिळू शकेल सिंगल डोस व्हॅक्सिन, Johnson & Johnson ने मागितली परवानगी
देशात लवकरच मिळू शकेल सिंगल डोस व्हॅक्सिन, Johnson & Johnson ने मागितली परवानगी
वॉशिंग्टन:-अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने (Johnson And Johnson Single Dose Vaccine) भारतात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिंगल डोस लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सरकारने या लशीला मंजुरी दिली तर भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेलं हे चौथं व्हॅक्सिन असेल. संपूर्ण जगभरात व्हॅक्सिनच्या साहाय्याने कोरोनाविरोधातील ही लढाई लढली जात आहे. भारतामध्ये सध्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियन व्हॅक्सिन स्पूटनिक व्ही च्या साहाय्याने लसीकरणाचे अभियान सुरू आहे. दरम्यान या तीनही व्हॅक्सिन्सचा डबल डोस घ्यावा लागतो. आता जॉन्सन अँड जॉन्सननच्या सिंगल डोस व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली तर हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात आतापर्यंत 49.53 कोटीपेक्षा अधिकांना व्हॅक्सिन देण्यात आले आहे.कंपनीने याआधी सोमवारी अशी माहिती दिली होती की, सिंगल डोसच्या व्हॅक्सिन संदर्भात कंपनीकडून भारत सरकारशी चर्चा सुरू आहे आणि याबाबत कंपनी आशावादी आहे. कंपनीच्या एका प्रवक्त्याने एका वक्तव्यात असे म्हटलं होतं की, जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडने 5 ऑगस्ट रोजी भारत सरकारकडे एकल खुराक असणाऱ्या कोव्हिड-19 व्हॅक्सिनच्या ईयू साठी अर्ज केला आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment