विजयदुर्ग-जैतापूर-नाटे-आडिवरे-पावस-रत्नागिरी-बोरिवली विरार एसटी लवकरच सुरू होणार





 विजयदुर्ग-जैतापूर-नाटे-आडिवरे-पावस-रत्नागिरी-बोरिवली विरार एसटी लवकरच सुरू होणार


रत्नागिरी प्रतिनिधी:-

विजयदुर्ग एसटी प्रेमी संयोजक प्रसाद देवधर सरपंच-विजयदुर्ग, अजित मांगलेकर आगार प्रमुख विजयदुर्ग, ग्रेसिस फर्नांडिस माजी सरपंच विजयदुर्ग, योगेश डोंगरे सामाजिक कार्यकर्ते विजयदुर्ग आदी विजयदुर्ग एसटी प्रेमींनी नुकतीच जैतापूर ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी जैतापूरच्या लोकनियुक्त सरपंच सौ.रेखा राजन कोंडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सदस्य दिवाकर आडविरकर, उपविभाग प्रमुख राजन कोंडेकर, श्रीमती तेजस्विनी मौर्ये, देविदास मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री देवधर यांनी सांगितले की लवकरच आम्ही विजयदुर्ग बोरिवली विरार व्हाया जैतापूर कायमस्वरूपी एसटी सुरू करीत असून सदर गाडीचा लाभ जैतापूर नाटे आडिवरे परिसरातील प्रवाशांना व्हावा म्हणून आम्ही या परिसरातील ग्रामपंचायतीना भेटी देत आहोत. सदर गाडीचे आँनलाईन बुकींग उपलब्ध करून देणार आहोत. या नंतर विजयदुर्ग जैतापूर नाटे राजापूर ओणी पाचल अणस्कुरा घाट कोल्हापूर पूणे अशी गाडी सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचे विजयदुर्ग आगार प्रमुख श्री मांगलेकर यांनी स्पष्ट केले व या गाड्या कायम नियमित सुरू रहाण्यासाठी या परिसरातील प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री देवधर यांनी केले. जैतापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सरपंच सौ.कोंडेकर यांनी सांगितले. आडविरकर गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या