जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पति-पत्नी विरोधात गुन्हा दाखल




जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पति-पत्नी विरोधात गुन्हा दाखल


 रत्नागिरी : शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून तरुणाला जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पती-पत्नीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.१५ ते ६ वा.कालावधीत थिबा पॅलेस रोड येथील सी ब्रिज अपार्टमेंटमध्ये घडली. वंदना शिंदे आणि प्रमोद शिंदे (थिबापॅलेस, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पती-पत्नीचे नाव आहे. त्यांच्याविरोधात प्रशांत चंद्रकांत जाधव (३९, रा. रा.सी. ब्रिज अपार्टमेंट थिबापॅलेस, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रशांत जाधव यांनी शिंदे दाम्पत्याविरोधात मे महिन्यात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरुन शिंदे दाम्पत्याने प्रशांत जाधव त्यांची पत्नी आणि मुलीला अश्लील आणि जातिवाचक शिवीगाळ केली. यात वंदना शिंदेला तिच्या पतीचीही फूस असल्याने या दोघांविरोधातही शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments