काव्यपुष्प
काव्यपुष्प
रंग उधळून नभी
प्रकाशल्या दिशा,
प्रभा प्रसन्न होवून
मनी जागवी आशा.
..नखाते ज्ञानेश्वर..
.परभणी.
--------------------------------------
गोपाळकाल्याला आगमन झाले
सकाळीच रिमझिम पावसाचे ,
सजवू अंगण, लावू पताका
दहीहंडी फोडू स्वागत करु गोविंदाचे.
स्वयंरचयिता
सौ.चंदन तरवडे, ढुमणे
कोपरगाव
---------------------------------------------------
नंदयशोदेचा कान्हा
करी गोकुळी रास
आज आहे अष्टमी
गोपाळ काला खास
सौ मधुरा कर्वे.( भावगंधा,)
पुणे.
-------------------------------
कृष्ण मेघांनी
झाकाळले अंबर
बांधी झुंबर
आला पाऊस
सुप्रभाती सुंदर
मनमंदिर
मोद जाहला
चराचरी दाटला
भाव उरला
सौ उषा राऊत
-----------------------------
शामलाक्षरी
गाठ सोडावी प्रयत्ने
यश कीर्ती अपोआप
गाठ पडतील सारे
पडेल अनोखी छाप ॥१॥
गाठ= तेढ , भेटणे
सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड
----------------------------------
रोज नवा दिवस, नवी आशा
नवी गाणी गायची
दुःख, अडचणी विसरून
सोनेरी स्वप्ने पहायची.
सौ. हेमा जाधव, सातारा
-------------------------------------
याद रखना
में ठीक हूँ लेकिन तुम अपना ख्याल रखना।
मेरी तसवीर तुम अपने दिल के पास रखना।
मीलो दूर हूँ तुमसे लेकिन तुम्हें दस कदम के
अंदर मेरी परछाई मिलेगी ये बात याद रखना।
तुम पहले भी अकेली नही थी आज भी नही
हो हर कदम मेरी और है ये याद बात रखना।
भले तुम्हें दुनिया में मिले चेहरे हजार लेकिन
में तुम्हारी आँखो धड़क रहा हूँ ये याद रखना।
जानता हूँ कुछ ही दिनों की बात है लेकिन
तेरे सिवा मेरे कोई करीब नही ये याद रखना।
नीक राजपूत
9898693535
------------------------------------------------
माणुसकी...…
माणुसकीने पछाडलेला एक
होता माणूस मनाने श्रीमंत ।
रिते होते सदन त्यांचे पण
मनातून तोच खरा भगवंत ।।
एके दिवशी शेतात जाता
उपाशी दिसला छोटा स्वान ।
मनसोक्त जेवण भरवून त्याने
वाचवले तेव्हा त्याचे प्राण ।।
माणूस होता दयावान फार
स्वानाला घेतले खिशात टाकून ।
घरी नेऊन केली त्याची शुश्रूषा
बायकोचे रोजचे बोलणे ऐकून ।।
असंच वाढत गेलं त्यांचं प्रेम
बंटी नाव त्या स्वानाला पडले ।
एका भाकरीत ते दोघेही खायचे
कसे घट्ट नाते हे त्यांचे जुळले ।।
माणूस होता जरा व्यसनी म्हणून
बायको आणि मुलं बोलायचे त्याला ।
बंटी मात्र त्याच्या सोबत असायचा
विसरून साऱ्या ऐशोरामाला ।।
जवळच्या नात्यांनी सोडली साथ
केले आपलेसे मुक्या प्राण्याने ।
बाहेर फेकला गेला तो माणूस जेव्हा
जगविले त्याला त्याच्या स्वानाने ।।
लक्षात ठेवा नेहमी एक गोष्ट
मुकी जनावरे ऋण फेडतात ।
ज्यांनी केली दया त्यांच्यावर
त्यांच्यासाठी ते हसत मरतात ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

Comments
Post a Comment