डोंबिवलीतील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवात मोफत बससेवा

डोंबिवलीतील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवात मोफत बससेवा
डोंबिवली : करोना महामारीने सामान्यांचे जगणे असह्य़ केले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. घरगाडा सांभाळण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत डोंबिवलीतील कोकणवासीयांना गणेशोत्सव काळात आपल्या गावी जाण्यासाठी शिवसेनेने मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या बससेवेचा लाभ घेण्यासाठी डोंबिवलीत राहत असलेल्या कोकण पट्टय़ातील रहिवाशांनी शिवसेना मध्यवर्ती शहर शाखा, शिवाजी महाराज पुतळा, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व किंवा डोंबिवली शहरात विविध भागात असलेल्या शिवसेना शाखांमधील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी केले आहे.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गणेशोत्सव काळात कोकणवासीयांना मोफत बससेवा देण्याची संकल्पना मांडली. शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून गणेशोत्सवात डोंबिवलीतील चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्यासाठी मोफत बस सोडण्यात येणार आहेत.
महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, मालवण, देवगड, वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी येथे या विशेष बस सोडण्यात येणार आहेत.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment