किंमत भडक्यानंतरही इंधन मागणीत वाढीचा क्रम कायम

किंमत भडक्यानंतरही इंधन मागणीत वाढीचा क्रम कायम
पेट्रोल विक्रीचा करोनापूर्व स्तर; डिझेल विक्री ९२ टक्क्य़ांपर्यंत
निर्बंध शिथिल होऊन, वाहतूक व संचारात वाढीचे प्रतिबिंब इंधनाच्या मागणीत ऑगस्टमध्ये सुरू राहिलेल्या वाढीतून स्पष्ट झाले. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे इंधन अर्थात डिझेलची विक्री, तर करोनापूर्व पातळीला लवकरच गाठू शकेल, असे सोमवारी प्रसिद्ध झालेली आकडेवरी दर्शविते.
देशभरात सर्वत्र किमती शंभरीपार गेलेल्या पेट्रोलच्या विक्रीने यापूर्वीच करोनापूर्व स्तर गाठला आहे, तर डिझेलची विक्री त्या पातळीपासून केवळ आठ टक्क्य़ांनी दूर आहे. विद्यमान ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ासाठी सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांच्या विक्रीच्या आकडेवारीच्या संकलनातून ही बाब पुढे आली आहे. मार्च २०२१ पासून सलग तिसऱ्या महिन्यांत इंधनाच्या मागणीत निरंतर वाढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी १ ते १५ ऑगस्टदरम्यान ९.८ लाख टन पेट्रोलची विक्री केली, जी मागील वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ९.४ टक्के अधिक आहे. तर १ ते १५ ऑगस्ट २०१९ म्हणजे करोनापूर्व कालखंडातील ९.५ लाख टनाच्या विक्रीपेक्षाही ती ३.७ टक्के अधिक आहे. त्याचवेळी डिझेलची विक्री १ ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान मागील वर्षांच्या तुलनेत १८.५ टक्क्य़ांनी वाढून २१.१ लाख टनांवर गेली. ऑगस्ट २०१९ मधील याच पंधरवडय़ाच्या तुलनेत डिझेलची विक्री अद्याप ७.९ टक्क्य़ांनी कमी आहे. गेल्या महिन्यात करोनापूर्व पातळीपेक्षा डिझेल विक्री ११ टक्क्य़ांनी दूर होती. दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू होण्यापूर्वी म्हणजे मार्चमध्ये इंधन मागणीने जवळपास करोनापूर्व पातळी गाठली होती.
साथ प्रतिबंध आणि अंतर नियमांचे पालन करताना, सार्वजनिक परिवहनापेक्षा लोकांचा कल खासगी वाहनांतून प्रवासाकडे वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे वाढलेल्या किमतीचा मागणीवर परिणाम दिसत नाही. पेट्रोल विक्रीने करोनापूर्व स्तरापुढे मजल मारली आहे. डिझेल विक्रीही दिवाळीत म्हणजे नोव्हेंबरमध्ये करोनापूर्व पातळी गाठू शकेल.
’ एस. एम. वैद्य, अध्यक्ष, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा