राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवर पूल उभारणे



राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवर पूल उभारणेबाबत


राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवर राजापूर शहर ते जैतापूर या दरम्यान एकही पूल उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील गोवळ, शिवणे खुर्द, पन्हळे, देवाचे गोठणे, नदीच्या पलीकडील गावे डोंगर, विल्ये, पडवे या भागातील लोकांची गैरसोय होत आहे. या भागातील गोवळ-डोंगर पूल उभारण्यासाठी मागणी होत होती. मात्र या पूलाच्या उभारणीच्या संदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. त्यामुळे अर्जुना नदीवर पूल उभारणीसाठी दुस-या जागेचे सर्वेक्षण व्हावे. तसेच पूल उभारणीसाठी ताक्ताळ निधी मंजूर करावा असे निवेदन श्री सिद्धेश जयंत मराठे,शिवणे खुर्द, राजापूर यांच्याकडून मा.ना.अशोक चव्हाण मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग,महाराष्ट्र राज्य व मा.आ.नाना पटोले अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी यांना देण्यात आले 


........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments