भाजप नेत्याला जिवंत जाळलं

भाजप नेत्याला जिवंत जाळलं
एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भाजपनेत्याला जिवंत जाळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात मंगळवारी एका स्थानिक भाजप नेत्याला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी भाजप नेत्याला कारच्या डिक्कीमध्ये बंद केलंआणि त्यानंतर कारला आग लावली. ज्यात भाजपच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचं व्ही. श्रीनिवास प्रसाद असं या नेत्याचं नाव आहे. प्रसाद हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते.या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. मेडकच्या एसपी चंदना दीप्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात लोकांनी भाजप नेत्याला त्यांच्या कारमध्ये बंद करून गाडीला आग लावण्यात आली.आम्हाला नेत्याचा जळालेला मृतदेह त्याच्या कारच्या डिक्कीमध्ये सापडला आहे. प्रसाद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment