शिवसेनेमागे ईडीपिडा

शिवसेनेमागे ईडीपिडा
भावना गवळींच्या संस्थांवर छापे; अनिल परब यांची आज चौकशी?
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटके नंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर छापे घातले. तसेच ‘ईडी’ने परिवहनमंत्री अनिल परब यांना आज, मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे.
अनिल परब यांच्या परिवहन विभागातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे घालण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठीच ‘ईडी’चा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे.
शिवसेनेच्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे घातले. गवळी यांच्याशी संबंधित संस्थांच्या पाच कार्यालयांवर छापे घालण्यात आले. तसेच अनिल परब यांच्याकडे असलेल्या परिवहन विभागाच्या नागपूरमधील प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घातले. प्रादेशिक परिवहन विभागातील बदल्यांमधील गैरव्यवहारप्रकरणी भाजप नेत्यांनी खरमाटे यांच्यावर आरोप के ले होते. त्याच खरमाटे यांना लक्ष्य करण्यात आले. या छाप्यांच्या माध्यमातून परब यांच्यावरील दबाव वाढवण्यात आल्याची चर्चा आहे.
राणे यांच्या अटके नंतर शिवसेनेला भाजपच्या नेत्यांनी सूचक इशारा दिला होता. त्यानंतर लगेचच परब यांना देण्यात आलेली नोटीस किं वा खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर टाकलेल्या छाप्यांतून भाजपने के ंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू के ल्याचे चित्र दिसते.
अनिल परब यांना मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस ‘ईडी’ने बजावली आहे. कायदेविषयक सल्ला घेऊनच पुढील निर्णय घेऊ, असे परब यांनी रविवारीच स्पष्ट के ले होते. उद्याच्या चौकशीसाठी परब उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.
परिवहनमंत्री परब आणि खासदार गवळी यांच्या विरोधात भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरून के ंद्रीय यंत्रणांनी सुरू के लेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकवटले आहेत. भाजपनेते किरीट सोमय्या अमुक नेत्याच्या विरोधात कारवाई होईल, असे सूतोवाच करतात आणि त्या नेत्याला लगेचच नोटीस बजाविली जाते. यावरून ईडी किं वा अन्य के ंद्रीय यंत्रणा भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावरून कारवाई करीत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी के ला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपवर टीका के ली आहे.
दिल्लीत आमचेही दिवस येतील!
आम्हाला ‘ईडी’ची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही. शिवसेना हे ‘ईडी’चे लक्ष्य आहे. पण त्याचा तसूभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही. मनोधैर्य खचणार नाही, उलट वाढेल. सूडाची भावना आणि बिनबुडाचे राजकारण यातून हे सुरू आहे. सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
‘ईडी’ची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी ‘डेथ वॉरंट’ नाही, तर प्रेमपत्र आहे. एकतर भाजपचा माणूस ‘ईडी’त अधिकारी आहे किंवा ‘ईडी’चा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत आहे.
– संजय राऊत, शिवसेना नेते
महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठीच ‘ईडी’चा वापर के ला जात आहे.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा