कॉलेज कट्टा रत्नागिरीतर्फे चिपळूण पुरग्रस्तांना उस्फुर्त मदत
कॉलेज कट्टा रत्नागिरीतर्फे चिपळूण पुरग्रस्तांना उस्फुर्त मदत
गोगटे जोगळेकर कॉलेज,रत्नागिरी मधील १९९५ साली जे कॉलेज मध्ये शिकत होते असे काही माजी विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी जी जे सी 95 फॅमिली कॉलेज कट्टा रत्नागिरी या नावाने एक व्हाट्सअप ग्रुप कार्यरत आहे. विविध सामाजिक क्षेत्रात हा ग्रुप कायम कार्यरत असतो. याच सामूहिक शक्तीचा उपयोग सामाजिक कामासाठी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण दिले जी जे सी ९५ फॅमिली कॉलेज कट्टा रत्नागिरी या ग्रुप ने तब्बल पूरग्रस्तांसाठी सव्वा लाख रुपयाचा रोख निधी मिक्सर गॅस शेगडी चादरी लेडीज जेन्ट्स कपडे भांडी कपडे मेडिसिन यांची मदत केली. मैत्रीच्या नात्याने बांधलेले सगळेजण कायमस्वरूपी एकत्र रहावेत, मित्रांच्या सुखदुःखात सहभागी व्हावेत या उद्देशाने या जी जे सी ९५ फॅमिली कॉलेज कट्टा रत्नागिरी या ग्रुपची स्थापना करण्यात आली .हा समूह निव्वळ मैत्री भेटी पुरता न रहाता, एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींच्या साह्याने सामाजिक बांधीलकी जपावी म्हणून, चिपळून पूरग्रस्तांना मदत करावी ही संकल्पना मांडण्यात आली. आणि सर्व ग्रुपच्या मेंबर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही रक्कम जमा केली व अन्य सामान जमा केले. काल मैत्री दिनाचे औचित्य साधून सौ पल्लवी मिरकर, सौ सोनाली बंदरकर, सौ राजश्री शिवलकर ,सौ अनघा दामले, सौ लीना घाडीगावकर, बिपिन बंदरकर,शेखर कवितके ,बिपिन शिवलकर ,सत्यशील सावंत व अजित साळवि यांनी सर्व ग्रुप च्या वतीने प्राथमिक स्वरूपात चिपळूणला जाऊन पूरग्रस्त भागांमध्ये मिक्सर शेगडी चादरी टी-शर्ट लेडीज जेन्ट्स कपडे मेडिसिन इत्यादी साहित्य यांचे वाटप करून आले.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment