राणेंच्या अटकेविरुद्ध आंदोलन; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा
राणेंच्या अटकेविरुद्ध आंदोलन; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा
सोलापुर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यात पोलिसांनी हस्तक्षेप करून १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊ न त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोंतम चौकात भाजपचे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊ न नारायण राणे यांच्या अटकेसह राज्यात ठिकठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने केली.
पक्षाचे शहर चिटणीस अनिल कंदलगी, महिला आघाडीच्या इंदिरा कुडक्याल, प्रशांत फत्तेपूरकर, राजकुमार पाटील, सुधाकर नराल, सुजित चौगुले, प्रकाश म्हंता, शिवराज पवार, लक्ष्मीकांत गड्डम, सतीश महाले, गणेश साखरे आदींचा आंदोलनात सहभाग होता.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment