राज्यात महानिर्मितीचे लक्षणीय वीज उत्पादन

 

Significant power generation of Mahanirmithi in the state

Advertisement

राज्यात महानिर्मितीचे लक्षणीय वीज उत्पादन

राज्यात पावसाचा पुन्हा एकदा खंड पडल्याने गेल्या काही दिवसांमध्ये विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली. वाढीव मागणीची पूर्तता करण्यासाठी महानिर्मितीने देखील आपल्या उत्पादनात भरीव वाढ केली आहे. महानिर्मितीने १० ऑगस्टला ७,१२९ मेगावॅट विजेचे लक्षणीय उत्पादन केले.अतिवृष्टीच्या संकटामुळे राज्यात विजेच्या मागणीत घट झाल्याने महानिर्मितीला देखील आपले वीज उत्पादन त्या प्रमाणात कमी करावे लागले होते. आता उद्योग व्यवसायाचे चक्र गतिमान होऊ लागले. सोबतच पावसाचा खंड पडला. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून विजेची मागणी सरासरी सुमारे २१,००० मेगावॅट वर पोहोचली आहे.महानिर्मितीने देखील तातडीचे उत्पादनात वाढ केली. १० ऑगस्ट रोजी सुमारे ७,१२९ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य केली. त्यात कोराडी १,८७२, खापरखेडा १,११४, चंद्रपूर १,८८४, भुसावळ १०३१ मेगावॅट, परळी ६५८, पारस २३५ मेगावॅट व नाशिक वीज केंद्रातून ३३५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली.  वाढीव मागणीत सरासरी ६,५०० ते ७,००० मेगावॅट वीज उत्पादन करून महानिर्मितीने आपले योगदान दिले. अगोदरच्या दैनंदिन वीज निर्मितीत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

मधल्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढल्याने महानिर्मितीचे वीज उत्पादन सरासरी ३,५०० मेगावॅट आले होते. आता सद्यस्थितीत महानिर्मितीचे बहुतांशी औष्णिक विद्युत प्रकल्प महावितरणच्या शेड्युलमध्ये असून आगामी काळात गरज पडल्यास सुमारे १०,००० मेगावॅट वीजनिर्मिती देखील साध्य करू शकतात, अशी माहिती महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी दिली.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments