‘अॅमेझॉन’ उच्च न्यायालयात

‘अॅमेझॉन’ उच्च न्यायालयात
‘अॅमेझॉन’ उत्पादन विक्रेता किंवा उत्पादक नाही, तर केवळ एक ऑनलाइन बाजारपेठ आहे.
मुंबई : उत्पादन घरपोच झाले नाही म्हणून दाखल झालेली फसवणुकीची तक्रार आणि या तक्रारीची दखल घेत कनिष्ठ न्यायालयाने ‘अॅमेझॉन इंडिया’चे उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांना बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अॅड्. अमृतपाल सिंग खालसा यांनी उल्हासनगर येथील महानगरदंडाधिकाऱ्यांकडे या प्रकरणी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने अग्रवाल यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु तक्रार पाहता हे प्रकरण फसवणुकीचे होऊ शकत नाही, असा दावा कंपनीने याचिकेत केला आहे. कंपनीकडून फसवणूक झाल्याचा वा हेतुत: उत्पादन घरपोच केले नसल्याचे तक्रारदार सिद्ध करू शकलेला नाही. शिवाय कंपनीच्या अशाप्रकारच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये अग्रवाल यांचा सहभाग नसतो. शिवाय तक्रारीत त्यांच्याविरोधात विशिष्ट आरोप नसताना त्यांना समन्स बजावणे योग्य नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.
‘अॅमेझॉन’ उत्पादन विक्रेता किंवा उत्पादक नाही, तर केवळ एक ऑनलाइन बाजारपेठ आहे. तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९अंतर्गत मध्यस्थ म्हणून कंपनीला संरक्षणाचा अधिकार आहे ही बाब महानगरदंडाधिकाऱ्यांनी विचारात घेतलेली नाही, असा दावाही कंपनीने याचिकेत केला आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा