रिलायन्स फाउंडेशनतर्फे चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी मदत-उमेद व पाटीदार युवा मंडळाचे सहकार्य



 रिलायन्स फाउंडेशनतर्फे चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी मदत-उमेद व पाटीदार युवा मंडळाचे सहकार्य


चिपळूण तालुक्यातील शहर व संलग्न ग्रामीण भागात आलेल्या पुरामुळे हजारो नागरिकांचे आयुष्य उध्वस्त झाले . अशा वेळेस प्राथमिक मदत म्हणून रिलायन्स फाउंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजावर ओढवलेल्या संकटामध्ये मदतीचा हात पुढे करत बिस्कीट व पाणी बॉटलचे वाटप चिपळूण शहर  व खेर्डी, मिरजोळी ,दळवटने इत्यादी गावामध्ये   करण्यात आले. त्यामध्ये २२५००  पाण्याच्या बाटल्या, २२५०० बिस्कीट  पाकीटे  यांचा समावेश आहे.या गरजू पूर ग्रस्थापर्यंत मदत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान "उमेद" चिपळूण व पाटीदार युवा मंडळ चिपळूण  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, पंचायत समिती "उमेद" चिपळूण चे सर्व अधिकारी, कर्मचारी व बचत गटातील महिलाच्या मदतीने गावातील गरजूना वाटपात मोलाचे सहकार्य लाभले. पाटीदार युवा मंडळ चिपळूण चे विनोद पटेल, विकी पटेल सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट राज्य समन्वयक श्री दीपक केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे , चिन्मय साळवी , प्रशांत परब व रविकांत वाडेकर यांनी वाटपाचे नियोजन केले .उमेद पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाटप करण्यात आले.



........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments