पुढील चार दिवस काही भागांत मुसळधारांचा अंदाज

पुढील चार दिवस काही भागांत मुसळधारांचा अंदाज
महाराष्ट्र:राज्याच्या बहुतांश भागांत दीर्घ ओढ दिलेला पाऊस पोषक वातावरणामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील चार दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता आहे.
कोकण विभागात मुंबई, ठाण्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमी पाऊस झालेल्या उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भाच्या काही भागांत रविवारी जोरदार सरी कोसळल्या.
ऑगस्टमध्ये राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात पावसाचे प्रमाण कमी नोंदले गेले. राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात या महिन्यात पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे पडला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ठरावीक भागांतच जोरदार पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कुठेही मोठा पाऊस होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यातील एकूण पाणीसाठय़ातही मोठी घट निदर्शनास येत आहे. हिमालयाच्या पायथ्याशी सरकलेल्या मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या खाली आला आहे. दक्षिण ओदिशा आणि लगतच्या छत्तीसगड परिसरात सध्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे या भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्व विदर्भ आणि लगतच्या भागांमध्ये वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे.
पाऊसभान..
’मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्य़ांत ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार.
’नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आदी जिल्ह्य़ांत ३१ ऑगस्टनंतर दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम. पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज.
’अकोला, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्य़ांत ३१ ऑगस्टनंतर दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा