भाजपा-शिवसेना कार्यकर्ते भिडले

 





भाजपा-शिवसेना कार्यकर्ते भिडले


सांगली:-सांगलीतील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान सांगलीतील हरभट रोडवर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी आमनेसामने आले. निवेदन देण्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही कार्यकर्त्यांना दूर करत शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचा ताफा या भागात आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. भाजपा पदाधिकारी स्टंटबाजी करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी केला.

भाजपा कार्यकर्त्यांनी हरभट रोडवर ठिय्या मांडला. “दोन तासांपासून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही वाट बघत होतो. पण आमचं निवेदन न स्वीकारताच मुख्यमंत्री निघून गेले.”, असा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांच ऐकणारे मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस बंदोबस्तात त्यांच्याकडे निवेदन मागितलं. त्याचबरोबर गर्दी कमी करण्यास सांगितलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन हातात दिलं नाही. मुख्यमंत्री पाच मिनिटं थांबले आणि निघून गेले. त्यानंतर जाणीवपूर्वक निवेदन फाडून त्यांनी शो बाजी केली.”, असा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.


--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या