कोल्हापूर व्यापारीवर्गात पुन्हा संताप

कोल्हापूर व्यापारीवर्गात पुन्हा संताप

कोल्हापूर:कोरोनाचा आरटीपीसीआर पॉझिटिव्हिटी रेट हा सहापेक्षा कमी आहे. तरीही नव्याने निर्बंध शिथिल करताना राज्य शासनाने कोल्हापुराला डावल्याने (kolhapur lockdown) व्यापारीवर्गातून (business) पुन्हा संताप व्यक्त होत आहे. कोरोना रुग्ण संख्येची टक्केवारी घटत असतानाही काढलेला शासन आदेश हा कोल्हापूवर अन्यायकारक असून, व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.राज्य शासनाने सोमवारी राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले. या ठिकाणी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. तर, दि. 4 जून ते 17 जून या कालावधीतील जे जिल्हे तिसर्‍या टप्प्यात होते ते आहे तसेच ठेवले आहेत.या ठिकाणची दुकाने सकाळी सात ते दुपारी चार या वेळेतच सुरू राहणार आहेत. तर हॉटेल व्यवसाय, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत.सोमवारी काढलेल्या आदेशाने व्यापारीवर्गातून (business) संताप व्यक्त होत आहे. कारण, नव्या आदेशात जरी आरटीपीसीआर रेट कमी झाला तरी जिल्हा दुसर्‍या टप्प्यात येईल, असे कोठेही म्हटले नाही. तसेच, स्थानिक जिल्हाधिकारी यांनाही अधिकार दिलेले नाहीत. हीच स्थिती राहिल्यास कोल्हापुरातील दुकाने कायमच दुपारी चारनंतर बंद करायची का असा सवाल व्यपारीवर्गातून उपस्थित होत आहे.


........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments