राजापूर तहसिल कार्यालयाने तौक्ते चक्रिवादळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांची नावासहित यादी का प्रसिद्ध केली नाही?



 राजापूर तहसिल कार्यालयाने तौक्ते चक्रिवादळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांची नावासहित यादी का प्रसिद्ध केली नाही?


नुकसान भरपाई वाटप करताना काही घोळ तर झाला नाही ना?


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्ह्यात तौक्ते चक्रिवादळ आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. रस्ते खचले, शेती ही वाहुन गेली. तशीच परिस्थिती राजापूर तालुक्यात देखील झाली. मात्र प्रत्यक्षात किती लोकांना नुकसान भरपाई पोचली याचा आढावा राजापूर तहसिल कार्यालयाने घेतला नाही. तौक्ते चक्रिवादळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे नेमके किती लोकांचे नुकसान झाले आणि प्रत्यक्षात किती लोकांना नुकसान भरपाई देण्यात आली, पंचनामे किती लोकांचे झाले? त्यापैकी किती लोकांना नुकसानभरपाईचे पैसे मिळाले अशी सविस्तर यादी प्रसिद्ध करणे गरजेचे होते. मात्र राजापूर तहसिल कार्यालयाने प्रत्यक्षात तसे काहिच केले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजापूर तहसिल कार्यालयाच्या वतीने करण्यात येणारे नुकसान भरपाईचे वाटप नेमके गरिबांना झाले की श्रीमंतांना? असा खडा सवाल उपस्थीत होत आहे. 

मिळालेल्या आकडेवारिनुसार तौक्ते चक्रिवादळात घरांच्या नुकसानीसाठी 15 लाख 86 हजार 970 रुपये भरपाई रक्कम देण्यात आली. मत्स्यव्यावसायिकांसाठी मदत म्हणून 1 लाख 15 हजार रुपये देण्यात आलेत. शेती नुकसान म्हणून 65 लाख 44 हजार 710 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेत. अशी आकडेवारी देण्यात आली. परंतू ही रक्कम नेमकी कोणकोणत्या नुकसानग्रस्तांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली याची यादी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. 

तौक्ते चक्रिवादळ आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामुळे राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील गावांसह गोवळ, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे, विल्ये, पडवे, डोंगर, जैतापूर, नाटे, तुळसुंदे, कुवेशी, आंबोळगड या भागात देखील प्रचंड नुकसान झाले. मात्र प्रत्यक्षात येथील किती लोकांना शासनाकडून म्हणजेच राजापूर तहसिल कार्यालयाच्या आपत्ती विभागाकडून मदत निधी मिळाला हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या बाबीची राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार मंत्री महोदय चौकशी करतील का हे पहावे लागेल.

................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या