कोकणात जाणाऱ्यांना करोना निर्बंधांतून सवलत?


कोकणात जाणाऱ्यांना करोना निर्बंधांतून सवलत?

कोकणात जाणाऱ्यांना करोना निर्बंधांतून सवलत?

प्रशासनाच्या अटींबाबत नाराजी, आरोग्यमंत्र्यांचे तोडग्याचे सूतोवाच


मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांवर करोना चाचणीची किंवा लसीकरणाची अट घालण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, सध्यातरी अशा अटी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत याबाबत तोडगा काढण्याचे सूतोवाच रविवारी केले.

गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रवेश करण्याच्या ७२ तास आधी करोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्याचा किं वा दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच कोकणात प्रवेश देण्याचा निर्णय तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच घेतला. परंतु त्याविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे याप्रकरणी आरोग्यमंत्री टोपे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

‘‘लसीकरण कमी असल्याने दोन लसमात्रा घेतलेल्यांना कोकणात प्रवेश किं वा करोना चाचणी बंधनकारक करणे सध्यातरी शक्य नाही. परंतु याबाबत दोन ते तीन दिवसांत तोडगा काढला जाईल’’, अशी माहिती टोपे यांनी दिली. करोनाची लक्षणे वगैरे असतील, तर चाचणी करणे योग्य आहे. दोन लसमात्रा घेतलेल्यांचे प्रमाणही कमीच आहे. त्यामुळे शारीरिक अंतर ठेवणे आणि मास्क बंधनकारक करणे हे नियम योग्य आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. सध्या सिंधुदुर्गात करोनाबाधितांचे प्रमाण ३.२४ टक्के  आणि रत्नागिरीत २.६५ टक्के  आहे.

राज्यातील करोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेल्यामुळे रेल्वे आणि एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी विशेष आणि जादा गाडय़ा सोडण्याची घोषणा केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने मध्य रेल्वेने विशेष गाडय़ांची घोषणा के ली. ८ जुलैपासून आरक्षणही सुरू झाले. त्यापाठोपाठ पश्चिम रेल्वेनेही गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला. कोकणात जाण्यासाठी एकू ण २१७ विशेष रेल्वेगाडय़ांची घोषणा करण्यात आली आहे. त्यांना गणेशभक्तांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कोकणात जाणाऱ्या १८०० एसटी गाडय़ांच्या आरक्षणालाही चांगला प्रतिसाद असून गट आरक्षणाच्या ६२३ आणि वैयक्तिक आरक्षणाच्या ८४४ एसटी पूर्णपणे भरल्या आहेत. तर ३३३ एसटीचे अंशत: आरक्षण झाल्याची माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यात दोन लसमात्रा घेतलेल्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अटीनुसार करोना चाचणीशिवाय पर्याय नाही. यावर तोडगा काढण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे, असे गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले. तर वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडय़ार यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा निषेध केला आहे. ‘‘कोकणात जाण्यासाठी नियमावली आधीच जाहीर के ली असती तर एसटी आणि रेल्वे गाडय़ांचे आरक्षण मोठय़ा प्रमाणात झाले नसते. गेल्या वर्षी कोकणात अनेक जण जाऊ न शकल्याने यंदा कु टुंबासह जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शासनाने यावर तोडगा काढावा’’, अशी मागणी जडय़ार यांनी केली.

सध्या उत्सवाचे दिवस आहेत. दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच कोकणात प्रवेश किं वा चाचणी बंधनकारक हे सध्या शक्य नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणाशी चर्चा करून तोडगा काढला जाईल. 

– राजेश टोपेआरोग्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

किं वा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर चर्चा करून तोडगा काढू. एक लसमात्रा घेतलेल्यांना परवानगी देण्याबाबत किंवा अन्य पर्यायांचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

– अनिल परबपरिवहनमंत्री

एसटी आणि रेल्वेचे आरक्षण अनेकांनी एक ते दोन महिने आधीच के ले आहे. आता आयत्यावेळी करोना नियम लागू के ल्याने त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. – दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या