वाहतूक नियम मोडताच १५ दिवसांत नोटीस

 


वाहतूक नियम मोडताच १५ दिवसांत नोटीस

वाहतूक नियम मोडताच १५ दिवसांत नोटीस

रस्ते वाहतूक मंत्रालयाची ई-चलानबाबत नवीन अधिसूचना


मुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन के ल्यास १५ दिवसांमध्ये  वाहतूक पोलीस, आरटीओ किं वा संबंधित विभागाकडून ई-चलानविषयक कारवाईची नोटीस पाठविण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने ई-चलानबाबत नवीन अधिसूचना जारी के ली आहे. त्यात बदल करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर देखरेख वाढणार असल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यातील काही शहरांतच त्याची अंमलबजावणी होईल, असेही अधिसूचनेत नमूद के ले

आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील १९ शहरात अंमलबजावणी होणार असून यात अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, उल्हासनगर, ठाणे, वसई-विरार या शहरांचा समावेश आहे.

सध्या या शहरांत बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅ मेरा, स्पीड गन व कॅ मेरांसह असलेल्या इंटरसेप्टर वाहनांमार्फत तसेच मोबाइलद्वारेही वाहतूक पोलीस, आरटीओकडून कारवाई के ली जाते. याशिवाय बॉडी कॅ मेरा, स्वयंचलित वाहन क्र मांक ओळखणारे कॅ मेरा शिवाय डॅशबॉर्ड कॅ मेराही बसवून कारवाईची मुभा दिली आहे. पोलीस किं वा आरटीओच्या वाहनांत डॅशबॉड कॅ मेरा बसवू शकतो, असे स्पष्ट के ले आहे.

शिवाय ज्या भागात या कॅ मेऱ्यांद्वारे देखरेख होत आहे, अशा भागात कारवाईचा इशारा देणारे चिन्ह, सांके तिक खुणा दर्शविण्याची सूचनाही केली आहे. जेणेकरून वाहतूक नियमांच्या उल्लंघनाला आधीच आळा बसेल. अशा अनेक सूचना त्यात करण्यात आल्या आहेत.

* वाहतूक नियमांचे उल्लंघन के ल्यास पंधरा दिवसांत वाहतूक पोलीस, आरटीओ किं वा संबंधित विभागाकडून संबंधितांना ई-चलान कारवाईची नोटीस पाठवण्यात येणार आहे.

* सध्या सात दिवसांत ई-चलान दंड भरण्याचा संदेश पाठविला जातो. पंधरा दिवसांत नोटीस पाठवून दंड भरण्याची माहिती दिली जाईल. दंड न भरल्यास आभासी न्यायालयात हे प्रकरण जाते.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या