आबलोली पोलीस पाटील यांचा पोलीस उपअधीक्षक चिपळूण यांचे हस्ते सत्कार

 


आबलोली पोलीस पाटील यांचा पोलीस उपअधीक्षक चिपळूण यांचे हस्ते सत्कार

चिपळूण:कोरोना काळात प्रत्येक गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व प्रशासन यांच्या नियमांचे पालन करून घेण्याची व  गावाची काळजी घेण्याचे काम व मुख्य जबाबदारी असते ती ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील. गुहागर तालुक्यात दोन नंबरची बाजारपेठ असणार्‍या रहदारी च्या आबलोली गावात  कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आबलोली  गावचे पोलीस पाटील महेश भाटकर यांचा सत्कार पोलीस उपअधीक्षक चिपळूण  मा. सचिन बारि यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोडके, उपनिरीक्षक दिपक कदम, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर खेतले तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. या सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या