यंदाचा गणेशोत्सवही ढोल-ताशांविनाच; मिरवणुकांना “ब्रेक”
यंदाचा गणेशोत्सवही ढोल-ताशांविनाच; मिरवणुकांना “ब्रेक”
पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेशोत्सव यंदाही करोना(COVID-19) संकटामुळे ढोल-ताशांच्या मिरवणुका, आकर्षक सजावटी, सामाजिक उपक्रमांच्या रेलचेलीविनाच होणार आहे. करोना संकट अद्यापही कायम असल्याने सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केली आहे. दि.10 ते 19 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे.गणेश मंडळांनाही सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्याही मोठ्या तसेच सार्वजनिक कार्यक्रमांविना साजरा करता येणार आहे. जास्तीत जास्त 4 फूट उंचीची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार आहे. घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांपेक्षा मोठी असू नये, असे नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच श्रींच्या आगमन तसेच विसर्जनावेळी कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, तसेच विसर्जनावेळी घरीच आरती करून नागरिकांनी विसर्जन घाटावर कोणतीही गर्दी न करता कमीत कमी वेळ थांबावे, असे आदेशात म्हटले आहे.
गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना
सर्व गणेश मंडळांना महापालिकेची नियमानुसार परवानगी घ्यावी लागेल
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. भपकेबाजपणा नसावा.
मंडळांनी लहान मंडप उभारावेत.
उत्सवासाठी देणगी, वर्गणी ऐच्छिक असावी. समाजपयोगी जाहिराती असाव्यात.
आरती, भजन, कीर्तनासाठी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी
श्रींच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन करण्यात यावी.
गणेशमूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करावे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment