ओबीसी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण द्या-भुजबळ

ओबीसी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण द्या-भुजबळ
नवी दिल्ली: केंद्र सरकारने संविधानामध्ये दुरुस्ती करून इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला घटनात्मक संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय समता परिषदेत करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
ओबीसींना दिल्या जाणाऱ्या २७ टक्के आरक्षणाला वैधानिक दर्जा आहे. अनुसूचित जाती तसेच जमातींना दिलेल्या आरक्षणाला घटनात्मक दर्जा आहे. तसाच घटनात्मक दर्जा ओबीसींच्या आरक्षणालाही दिला गेला पाहिजे तरच आत्ता ओबीसींच्या आरक्षणाबाबत होणारी हेळसांड संपेल. आत्ता ओबीसींना घटनात्मक आरक्षण नसल्यामुळे त्याच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे भुजबळ म्हणाले. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये रविवारी अखिल भारतीय समता परिषद घेण्यात आली. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा