‘महाआघाडी सरकारने सिंधुदुर्गचा विकास रोखला’-नारायण राणे


‘महाआघाडी सरकारने सिंधुदुर्गचा विकास रोखला’

‘महाआघाडी सरकारने सिंधुदुर्गचा विकास रोखला’-नारायण राणे

सावंतवाडी :  माझ्या घरावर दगडफेक करणाऱ्यांची यादी  माझ्याकडे आजही आहे. त्यामुळे आता माझ्यातील नारायण राणे पुन्हा जीवंत होवू देवू नका, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी बांदा येथे दिला. दरम्यान त्यांनी खासदार संजय राऊ त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केली. यावेळी .राऊ त हे सामनाच्या पलीकडे जावून काहीही करु शकत नाहीत, हिंमत असेल तर त्यांनी समोर येवून बोलावे, असाही इशारा दिला.

राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रविवारी दुपारी बांद्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,  आमदार कालिदास कोळंबकर, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास रोखण्याचे काम आघाडी सरकारने केले. मी पालकमंत्री असताना जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे १ लाख ४५ हजार रुपये होते. मात्र आता परिस्थिती दयनीय आहे.मी केंद्रात मंत्री आहे, त्यामुळे गणेश चतुर्थीनंतर चिपीला विमान उतरेल. विमानतळाचे उद्घाटन हे आम्हीच करणार आहोत, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवार अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:च्या खात्याचे पाहावे असे त्यांनी सांगितले.केंद्रीय मंत्री  राणे यांच्या खात्याला फारसा निधी नाही अशी टीका नुकतीच  पवार यांनी केली होती.

राणे म्हणाले, अजित पवार यांनी आधी आपल्या खात्याकडे पहावे. मी अजून त्यांच्याकडे वळलोच नाहीय. एका रात्रीत आपल्यावरचे आरोप आणि केसेस कशा काढायच्या हे शिकायचे तर अजित पवार यांच्याकडून, माझ्या उद्योग खात्याला अर्थ खात्याकडून निधी मिळतो त्यामुळे कुणी निधीची चिंता करू नये. आम्ही यापूर्वी साडेचार लक्ष कोटी निधी दिला होता आणि त्यातील तीन लाख कोटी निधी खर्च ही झाला आहे.

‘तरूणांनी उद्योजक होऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावावा’

सावंतवाडी  : शिवसेना घडवण्यासाठी माझा वाटा आहे.शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अतिरेक्यांपासून जीवाला धोका होता. शरद पवार यांनी अज्ञातस्थळी जाण्यास सांगितले होते. आतंकवादी बाळासाहेबांच्या जीवावर उठले होते. बाळासाहेबांनी मला बोलावून संरक्षण देण्याची सूचना केली होती. मी माझ्या सहकाऱ्यांची टीम घेऊन बाळासाहेबांना रात्रंदिवस जागून संरक्षण दिले, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले,देशातील जनतेचे दर डोई उत्पन्न वाढविणारे माझे खाते आहे. उद्योग व्यवसाय वाढविणारे आणि उद्योजक घडविणारे माझे खाते आहे. कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, जनतेने तरुण , तरुणींनी उद्योजक व्हावे आणि माझ्या खात्याला,देशाच्या प्रगतीला हातभार लावा. मी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आपल्याला सर्वतोपरी सहकार्य माझ्या खात्यातून मिळेल.देशाचे आणि कोकणचे आर्थिक परिवर्तन करण्याठी सर्वतोपरी माझे प्रयत्न आणि सहकार्य राहील. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, राजन तेली उपस्थित होते.

राणे म्हणाले,आधी स्वत:च्या मुलांचे गुण बघा. संजय राऊ तमुळे शिवसेना खड्डय़ात जात आहे. सामना आणि संजय राऊ तची प्रतिमा बौद्धिक लोकांमध्ये मलिन झाली आहे. माझ्या मुलांशी बरोबरी करू नको. माझे दोन्ही मुलगे उच्चशिक्षित आहेत. माझ्यावर प्रेम करणारे माझे मुलगे असून माझी प्रतिमा जपण्याची काळजी ते घेत आहेत. राऊ त तुमची लेखणी थांबवा अन्यथा आम्हीही आमचा प्रहार करू. असा निर्वाणीचा इशारा दिला.

मंत्री अनिल परब यांचा बुरखा शेवटी माध्यमांनीच फाडला. पोलिसांना माझ्या अटकेचे आदेश जणू राष्ट्रपतीच्या आवेशात देत होता. माझ्यावर वाईट बोलल्याशिवाय सेनेत पद मिळत नाही. म्हणून माझ्यावर सेनेवाले टीका करतात. याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गातील खासदार आहेत. त्यांचे नाव घेऊन माझा दिवस खराब करणार नाही. अशी नामोल्लेख टाळत विनायक राऊत यांच्यावर टीका केली


....................................
------------------------------

www.freshnewz.in


टिप्पण्या