लोकमान्य टिळकांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवा:-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत





 लोकमान्य टिळकांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवा:-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत


रत्नागिरी  : लोकमान्य टिळक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे, त्याचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेच असून यामध्ये ग्रंथालयाचे महत्वाचे स्थान आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदीर, रत्नागिरी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित प्रतिमा पुजन व ग्रंथप्रदर्शन निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, ॲङ विलास पाटणे, विजयकुमार जगताप ग्रंथपाल, ज्येष्ठ साहित्यीक मदन हजेरी, आदि मान्यवर उपस्थित होते.सामंत म्हणाले लोकमान्य टिळक अध्यासन (अभ्यास व संशोधन) केंद्राचे उद्घाटन  आज झाले असून लोकमान्य टिळक जन्मस्थान डागडुजी, लोकमान्य टिळक यांच्या नावाने असलेले ऐतिहासिक ग्रंथालय अद्यावत करणे यासाठी निधी मंजूर झाली आहे. अधिकारी वर्गाने सकारात्मक भूमिका ठेवून ही कामे एक वर्षाच्या आत पूर्ण करावीत. या कामांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करुन दर महिन्याला कामांचा आढावा घ्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments