राज्यपालांबरोबर मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक

राज्यपालांबरोबर मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांची गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपली.
मुंबई: गेल्या वर्षभरापासून भिजत पडलेला विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची येत्या दोन-तीन दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर बैठक होणार आहे.
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांची गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपली. नव्या सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी राज्य सरकारकडून नावे पाठविली, त्यावर राज्यपालांनी निर्णय न घेता हे प्रकरण प्रलंबित ठेवले. त्यावरून राज्यपाल विरुद्ध आघाडी सरकार असा वाद धुमसत राहिला. राज्य मंत्रिमंडळाने १२ सदस्यांच्या नावांची यादी अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती यादी पाठविण्यात आली, त्यालाही आठ-नऊ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार व महसल मंत्री थोरात यांनी मागील गुरुवारी राज्यपालांना भेटीची वेळ मागितली होती. परंतु पूर्वनियोजित बैठका व कार्यक्रमांमुळे राज्यपालांनी त्यांना वेळ दिली नाही. त्याबाबतही आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त के ली.
या संदर्भात सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्यपालांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्यपाल सध्या दिल्लीत आहेत. १ सप्टेंबरला ते मुंबईत येणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना भेटीची वेळ दिली जाणार आहे. त्यानुसार साधारणत: दोन किं वा तीन दिवसांत ही बैठक होईल. त्यात विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा