सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले करक आंबा या गावी अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे

 





सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले  करक आंबा या गावी अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे 


सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले  करक आंबा  (पाचल परिसर)या गावी याठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे या ठिकाणी नदीच्या पात्राची दिशा बदलून नदीचे पाणी शेतीतून  जात आहे मुसळधार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे  येथील मोरी सुद्धा वाहून गेली आहे. यावेळी  मांडवकर वाडीतील लोकांचा गावाशी  संपर्क तुटला होता.अश्या वेळी येथील लोकांनी आपले कौशल्य वापरून शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता लाकडाचा  साकव तयार केला. याठिकाणी कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही.आज येथील ग्रामस्थांच्या मागणीने काँग्रेसच्या मा. आमदार हुस्नबानु खलीपे मॅडम यांनी घटना स्थळी भेट दिली व त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पहाणी केली.
यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस किशोर नारकर, करक चे सरपंच सुरेश ऐनारकर , पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे , राजन लब्दे,विनायक सक्रे, करक गावच्या उपसरपंच,ग्रामस्थ वरेकर उपस्थित होते.यावरून एक गोष्ट लक्षात येते.. प्रशासन लक्ष देईल तेंव्हा देईल, प्रशासन मदत करेल तेंव्हा करेल.. पण तो पर्यंत वाट न पाहता आपल्याकडून जेवढे करता येईल तेव्हढे कार्य करून आलेल्या संकटावर मात करता येते.

.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या