रिझव्र्ह बँकेकडून पुढील वर्षांत व्याजदरात वाढ शक्य

रिझव्र्ह बँकेकडून पुढील वर्षांत व्याजदरात वाढ शक्य
मुंबई : महागाई दराची चढती कमान ही रिझव्र्ह बँकेच्या सहनशीलतेचा अंत पाहत असून, आगामी २०२२ च्या पूर्वार्धात व्याजदरात वाढीचे पाऊल मध्यवर्ती बँकेकडून टाकले जाऊ शकेल, असा कयास विश्लेषकांनी शुक्रवारी व्यक्त केला.
रोकड सुलभतेच्या परिस्थितीला पूरक ठरलेले, परिस्थितीजन्य लवचीकतेच्या धोरणालाही मध्यवर्ती बँकेकडून आगामी वर्षांपासून मुरड घातली जाऊ शकेल, असे विश्लेषकांचे मत आहे. गुरुवारी सायंकाळी जुलै महिन्यातील किरकोळ महागाई दर ५.६ टक्के म्हणजे रिझव्र्ह बँकेसाठी सहनशील असलेल्या सहा टक्क्य़ांच्या कमाल पातळीच्या खाली आल्याचे सांगणारी दिलासादायी आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतरही विश्लेषकांनी व्याजदर वाढीचे हे अनुमान व्यक्त केले आहे. आधीच्या महिन्यांत म्हणजे जूनमध्ये मुख्यत: अन्नधान्याच्या किमती कडाडल्याने महागाई दराने ६.२६ टक्क्यांची पातळी गाठली होती.
तथापि, ऑगस्टच्या सुरुवातीला पतधोरणाचा द्विमासिक आढावा घेताना, रिझव्र्ह बँकेने व्याजदर आहे त्या पातळीवर कायम ठेऊन, अर्थवृद्धी प्रोत्साहनाच्या भूमिकेतून रोकड सुलभता आणि परिस्थितीजन्य लवचीकतेचा पवित्राही कायम ठेवला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही गुरुवारी ‘सीआयआय’च्या वार्षिक बैठकीत बोलताना, विद्यमान परिस्थिती व त्यातील सुधाराचे संकेत पाहता रिझव्र्ह बँकेकडून तिचा हा पवित्रा इतक्यात बदलला जाईल, असे वाटत नसल्याचे मत व्यक्त केले होते.
रेपो दरात ०.२५ टक्के वाढीचे कयास
जर चलनवाढीवर दबाव कायम राहिला आणि अमेरिकी फेडसह जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून पतधोरण सामान्य स्तरावर आणत व्याजदर वाढविले गेले, तर रिझव्र्ह बँकेलाही तिच्या विद्यमान धोरणाला मुरड घालणे भाग ठरेल. मध्यवर्ती बँकेकडून या संबंधाने आर्थिक वर्षांच्या अखेरीस निश्चित भूमिका येणे अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या सहामाहीत रेपो दर किमान पाव टक्क्य़ांनी वाढविला जाण्याची चिन्हे आहेत.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा