ओव्हेन्स कॉर्निंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,कंपनी तर्फे पुरग्रस्तांना गृहऊपयोगी वस्तू, धान्याचे किट देवुन मदतीचा हात!
ओव्हेन्स कॉर्निंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,कंपनी तर्फे पुरग्रस्तांना गृहऊपयोगी वस्तू, धान्याचे किट देवुन मदतीचा हात!
चिपळूणचे सुपुत्र डॉ.भालचंद्र सोनू पेढांबकर यांचा पुढाकार
चिपळूण:-कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर, दरडी कोसळण्यातून सर्वत्र हाहाकार उडाला. या दुर्दैवी घटनेत जीवितहानीबरोबर मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. या हानीची दखल घेऊन प्रयास, ओव्हेंस कॉर्निंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे कोंकण रिलीफ फंडचे सदस्य श्री. डॉ.भालचंद्र सोनू पेढांबकर व त्यांचे सहकारी संपूर्ण डॉक्टर टीमने पूर पीडितांना मदत करण्याचे पाऊल उचलले.यामध्ये बाधित कुटुंबांना विशेष मदत ही घरपोच व्हावी यासाठी संपूर्ण टीमने प्रत्यक्ष घरा-घरामध्ये भेटी देऊन संपूर्ण किटचे वाटप केले.यानुसार चिपळुणात नुकतेच पूरग्रस्तांना गृहउपयोगी वस्तू, जीवनावश्यक वस्तुंचे किटचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर पूरग्रस्त बाधित कुटुंबांना होत असलेल्या दूषित पाणी, त्याचबरोबर ओढवलेलं आजारपण याविषयी प्रत्येक कुटुंबाचे विचारपुस करून डॉक्टर टीमने विशेष सहकार्य व मदत केली.यामध्ये चिपळूण पूरग्रस्त विभागातील पेठमाप, शंकरवाडी, मुरादपूर, वडारकॉलनी, खेर्डी, गोवळकोट, पानगल्ली येथे वाटप झाले.या अतिवृष्टीतून झालेली हानी न भुतो न भविष्यती अशीच असून आता मदतीचा ओघ चालू राहिला पाहिजे. किंवा पूरग्रस्त असतील त्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देणे, ओव्हेंस कॉर्निंग इंडिया प्रायव्हेट कंपनी तर्फे कोंकण रिलीफ फंड या संघटनेची पूर्वपारची परंपरा राहिली आहे.चिपळूण मधील आलेल्या महापुरात बाधित झालेल्या कुटुंबांना मदतीचा हात देताना चिपळूणचे सुपुत्र श्री.डॉ.भालचंद्र सोनू पेढांबकर व सोबत ओव्हेन्स कॉर्निंग इंडिया प्रायव्हेट, कंपनी चे संपूर्ण डॉक्टर टीम समवेत..
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment