शेतकऱ्यांची डोकी फोडा सांगणारा अधिकारी अडचणीत; सरकारकडून कारवाईचे आदेश

शेतकऱ्यांची डोकी फोडा सांगणारा अधिकारी अडचणीत; सरकारकडून कारवाईचे आदेश
भाजपाच्या एका बैठकीला विरोध करण्यासाठी जाताना एका महामार्गावरील वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटावर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कथित लाठीमारात सुमारे १० जण जखमी झाले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्यासह पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते या बैठकीत हजर होते. राज्य पोलिसांच्या शेतकऱ्यांविरोधातील या कारवाईवर अनेकांनी टीका केली आणि तिच्या निषेधार्थ निरनिराळ्या ठिकाणी अनेक रस्ते रोखून धरण्यात आले होते. दरम्यान, सोशल मीडियावर कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते पोलिसांना विरोध करणाऱ्यांचे डोके तोडण्यास सांगत होते. हेच आयुष सिन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सांगितले आहे.
कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आयुष सिन्हा यांनी पोलिसांना भाजप नेत्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजप खासदार वरुण गांधींसह अनेक लोकांनी टीका केली होती.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा