शब्द लहरी
शब्द लहरी
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
मग देखा तेथ फाल्गुन ।घेतला असे भ्रांती कवळुन । जैसा घनपटली
भानू । आच्छादिजे ।
तयापरी तो धनुर्धार । जाहलासे
दुःखे जर्जरू ।जैसा ग्रीष्म काळी
गिरीवरू वणवणला का ।।
म्हणौनि सहजे सुनिळू । क्रुपाम्रुते सजळु । तो वोळलासे श्री
गोपाळु । महामेधू ।
अर्जुनाच्या मनःस्थिती वर ज्ञानेश्वर
हे रूपक करतात , जसा मेघपटलांनी
सूर्य आच्छादित व्हावा त्या प्रमाणे
अर्जुन या वेळी भ्रांती ने घेरला गेला
होता असे समजा .
किंवा जसा उन्हाळ्यात वणव्याने
डोंगर व्यापला जावा . तसा अर्जुन
दुःखाने अगदी जर्जर होऊन गेला होता
म्हणून अशा वणवा लागलेल्या
डोंगरावर जसे पाण्याने भरलेले नीलवर्ण मेघ कोसळून तो शांत करावा तसा आधीच स्वभावतः सहज
सरळ सावळा वर्ण असलेला व क्रुपाम्रुत
रूप जलाने भरलेला असा तो महामेघरूपी गोपाळ अर्जुनाकडे
वळून आला
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक
------------------------------------------
निसर्ग
🌷 पुष्प क्रमांक ३६ 🌷
निसर्गात झाडांच्या अंगाखांद्यावर पशू,पक्षी खेळतात.किती पक्षी तर आपली घरटी फांद्यांवर मांडतात.मानव त्यांचे घर तोडून टाकतो आणि आपले घर बांधतो आणि मग एखादा बिबट्या,हत्ती घरात,शेतात शिरला तर, आरडाओरड करता? त्याला मानव पळवून पळवून मारून टाकतो.पशू पक्षांचे घर तोडता,जाळता मग त्यांने पण,मानवाला मारले तर चालेल का?नाही ना..हा विचार करा.जागा व जगू द्या..हे तंत्र अंगिकारा.सर्वांना जगण्याचा अधिकार आहे.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा