राज्यात आघाडी असली तरिही कोकणात कॉंग्रेस पक्ष संघटना वाढविण्याकडे जास्त लक्ष देणार:-नाना पटोले
राज्यात आघाडी असली तरिही कोकणात कॉंग्रेस पक्ष संघटना वाढविण्याकडे जास्त लक्ष देणार
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने राजकिय वर्तुळात खळबळ, तर कार्यकर्त्यांना झाला आनंद
भविष्यात कोकणात कॉंग्रेस एक नंबरचा पक्ष असेल: नाना पटोले
रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी असलेर तरी देखील कॉंग्रेस पक्ष म्हणुन आम्ही संघटना वाढविण्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. कोकणात पक्ष वाढविणार आहोत. भविष्यात कोकणात कॉंग्रेस एक नंबरचा पक्ष असेल असे मत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी चिपळूण येथे केले. बुधवारी नाना पटोले यांनी चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी पत्रकारांच्या राजकिय संदर्भातील प्रश्नावर नाना पटोले बोलत होते. नाना पटोले म्हणाले कॉंग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. आणि हिच विचारसरणी कॉंग्रेस पक्षाची असल्यामूळे लोकांना पक्षाकडून खुप अपेक्षा आहे. यामुळेच पक्ष आता मजबूत होणार आहे. अधिक सक्षम होणार आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे कोकणात राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कॉंग्रेस पक्षाच्या सच्च्या आणि निस्सीम कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment