माढा तालुक्यात वीज अभियंत्याला आंदोलकांकडून पेटवण्याचा प्रयत्न


माढा तालुक्यात वीज अभियंत्याला आंदोलकांकडून पेटवण्याचा प्रयत्न
प्रतिनिधिक छायाचित्र

माढा तालुक्यात वीज अभियंत्याला आंदोलकांकडून पेटवण्याचा प्रयत्न

महावितरणकडून थकीत वीजबिले वसुलीची मोहीम कठोरपणे राबविली जात आहे.


सोलापूर : मोडनिंब (ता. माढा) येथे खंडित केलेली वीज जोडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावाने महावितरणच्या अभियंत्याला पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. वीज कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेनंतर महावितरणने मोडनिंब भागातील शेतकऱ्यांना आठ दिवसांची मुदत देत मुदतीनंतर बिले न भरणाऱ्या शेतीपंपांचा वीजपुरवठा पुन्हा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

महावितरणकडून थकीत वीजबिले वसुलीची मोहीम कठोरपणे राबविली जात आहे. या मोहिमेला विरोध करण्यासाठी मोडनिंब येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर अडीचशे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शनिवारी नोटीस देऊ न सोमवारी केलेल्या आंदोलनस्थळी टेंभुर्णीचे उपकार्यकारी अभियंता उद्धव जाधव यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, सात-आठ शेतकऱ्यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर काहींनी अभियंता जाधव यांना यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. पोलीस व वीज कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून जाधव यांना वाचविले.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments