जत येथे एकाचा खून; आर्थिक वादातून तरुणाचे कृत्य

जत: : जत शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील पशुपैदास केंद्राच्या हद्दीत (कॅटल फार्म जवळ) एकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना घडली. बंदेनमाज उर्फ बंडा मकदूम शेख (वय ४०) रा.सातारा रोड, मदारी गल्ली जत असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा खून आर्थिक देवाण-घेवाणच्या कारणावरून झाला आहे. याबाबतची फिर्याद मुन्ना मकदुम शेख यांनी पोलिसांत दिली आहे .ही घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जत येथील संशयित आरोपी संतोष हारणे (वय २१ ) हिवरे ता .जत येथून रात्री उशिरा अटक केली. पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बंदेनमाज शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. गेल्या काही महिन्यापूर्वी जत शहरातील संतोष हारणे याला चाळीस हजार किमतीची म्हैशीची विक्री केली होती. या म्हशीला गंभीर आजार असल्याने ती परत शेख यांस परत दिली होती.
व्यवहारातील पैसे परत करण्यासाठी शेख यांच्याकडे तगादा
दरम्यान, यामध्ये हारणे यांनी व्यवहारातील पैसे परत करण्यासाठी शेख यांच्याकडे तगादा लावला होता. यातून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मयत शेख यांनी हारणे यास तीस हजार रुपये देऊन वादाचा विषय मिटविण्यात आला होता.ही घटना समजताच जतचे पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले व जत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोपाळ भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर संशयितांला पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली.दरम्यान, संशयित बाज- हिवरे परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी हिवरे येथून संशयित संतोष हारणे या तरुणाला अटक केली आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा पोलिसात नोंद झाली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे करत आहेत.
......................................
------------------------------
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment