रत्नागिरीतील उद्यानगर येथील कोव्हिड हॉस्पिटल मधील कच-याची लावण्यात येणारी विल्हेवाट शासनाच्या नियमाप्रमाणेच होते का?




रत्नागिरीतील उद्यमनगर येथील कोव्हिड हॉस्पिटल मधील कच-याची लावण्यात येणारी विल्हेवाट शासनाच्या नियमाप्रमाणेच होते का?



रत्नागिरी:-शासनाने कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर विलगिकरण केंद्र तसेच गृह विलगिकरणात निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी काही नियम निर्देशीत केले आहेत. मात्र रत्नागिरीतील उद्यमनगर येथील कोव्हिड हॉस्पिटल मधील कच-याची विल्हेवाट शासन निर्णयाप्रमाणे होतेय का हा प्रश्न उपस्थित होतोय. ज्या संस्थेने किंवा आरोग्य यंत्रणेने या संबंधी पाहणी करायची असते ती केली आहे का हा देखील प्रश्न उपस्थीत होत आहे. उद्यमनगर येथील कोव्हिड हॉस्पिटलमधील कचरा गोळा करुन तो साळवी स्टॉपलाच जमिनीत पुरला जातो असे रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-याने  सांगितले. मात्र शासनाने निर्देशीत केलेले नियमांचे पालन केले जाते का हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे होम क्वारंटाईन मध्ये असलेल्या कोव्हिड रुग्णांच्या संदर्भातील कच-याची विल्हेवाट देखील शासकीय नियमानुसार होते याची प्रत्यक्ष पाहणी संबंधित विभागाने केली आहे का असा सवाल उपस्थीत केला जात आहे.



..............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments