कोविशिल्ड लसीचा कळाबाजार करणाऱ्यास पनवेल गुन्हे शाखेकडून अटक


Panvel Crime Branch arrests man for selling covishield vaccine

कोविशिल्ड लसीचा कळाबाजार करणाऱ्यास पनवेल गुन्हे शाखेकडून अटक

नवी मुंबई: मागील ऐक वर्षांपासून देशात करोनाचा प्रादुर्भाव आहे. करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान लसीचा काळा बाजार होत असल्याचे प्रकरणे समोर येत आहेत. कोविशिल्ड लसीचा काळाबाजार होत असल्याची माहिती पनवेल गुन्हे शाखेला मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी सदर इसमांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

नवी मुंबईचे पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार, किशोर कुमार खेत (कामोठे,रायगड) हा राजीव गांधी ब्रिज सेक्टर, नेरूळ नवी मुंबई येथे कोविशिल्ड लस बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करत होता. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक अजय माहुले यंच्यासह सापळा लावून अरोपीस अटक करण्यात आली.

आरोपी हा कोविशिल्ड लसीचे १५ डोस ६०,००० रुपयाला विक्री करीत होता. दरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. औषध निरीक्षक अजय माहुले यांच्या तक्रारी वरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा कलम ४२०, जीवनावश्यक वस्तू कलम ३, औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा कलम १८, २७ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी किशोर कुमार खेत यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष ०२ नवी मुंबई करीत आहोत.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments