देवाचे गोठणे सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे व झिंबरे भावकी यांनी केलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी यांचे राजापूर उपविभागीय दंडाधिकारी यांना न्यायोचीत कार्यवाही करण्याबाबतचे आदेश

 


देवाचे गोठणे सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे व झिंबरे भावकी यांनी केलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी यांचे राजापूर उपविभागीय दंडाधिकारी यांना न्यायोचीत कार्यवाही करण्याबाबतचे आदेश


रत्नागिरी प्रतिनिधी:- 

राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे व झिंबरे भावकी यांनी केलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे राजापूर उपविभागीय दंडाधिकारी यांना न्यायोचीत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार यांस अवगत करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

उपरोक्त विषयाबाबत सदानंद तानाजी झिंबरे व ईतर, समस्त झिंबरे भावकी, रा.सोगमवाडी, देवाचे गोठणे, ता.राजापुर, जि. रत्नागिरी यांचा तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. सदरच्या अर्जामध्ये अर्जदार यांनी किरण शांताराम सोगम आणि विकास शांताराम सोगम-गावकर व वाडीप्रमुख सोगम वाडी ता. राजापूर जि. रत्नागिरी आणि वाडीतील अन्य ग्रामस्थ (गावकी) यांनी आम्ही मृत व्यक्तीचे अंतिम विधी हिंदु धार्मिक रुढी परंपरेनुसार तेरावा आणि चौदावा विधी केल्यामुळे आमच्यावर सामाजिक बंधने लादुन बहिष्कृत केल्याबद्दल आमच्या तक्रारीची दखल घेण्याबाबत असा तक्रार अर्ज  महसूल मंत्री यांचे कार्यालय, मंत्रालय मुबई यांचे कडून या कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. सदर विषयाच्या या कार्यालयाकडे केलेल्या दि. 09/03/2021 रोजीच्या अर्जकामी या कार्यालयाकडून दि.23/03/2021 रोजीच्या पत्रान्वये पोलीस अधिक्षक, रत्नागिरी व आपल्याकडे चौकशी करुन योग्यती कार्यवाही करावी व अहवाल इकडे सादर करणेबाबत कळवले आहे. तसेच अर्जदार यांचे दि . 09/03/2021, दि. 15/03/2021 व दि. 30/03/2021 या तिन्ही पत्राचा आशय एकच आहे. त्यानुसार अर्जदार यांनी अर्जात नमुद केल्याप्रमाणे दि. 27/12/2020 रोजी त्यांचे चुलते ऊमाजी विश्राम झिंबरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर त्यांचे अंतिम धार्मिक विधी हिंदु रुढी रिवाजाप्रमाणे दहावे, बारावे आणि तेरावा विधी करून करण्यात आले. तसेच त्यांच्या सर्व विधी सोगम वाडी गावकार तसेच फौजदार आणि इतर ग्रामस्थ यांना आमंत्रण करून करण्यात आल्या. मात्र सदर विधी करत असताना तेरावे आणि चौदावे विधीसाठी समस्थ ग्रामस्थांना आमंत्रण करून देखील सदर विधीसाठी ग्रामस्थ उपस्थित राहिले नाही. अशा स्वरुपाची तक्रार नमूद केली आहे. तसेच अर्जदार यांनी किरण शांताराम सोगम, विकास शांताराम सोगम - गावकार सोगमवाडी तसेच दिनांक 15/01/2021 रोजीच्या ग्राम सभेत उपस्थित ग्रामस्थ (गावकी) यांनी आमच्या भावकीच्या संदर्भात घेतलेला निर्णय बेकायदेशीर व सामाजिक बहिष्कार टाकण्यासारखा असून त्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व आमचे वैयक्तिक व सामाजिक स्वातंत्र्याचे रक्षण करावे व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या कार्यालयाकडे केली आहे. सोबत मुळ अर्जाची छायांकीत प्रत आहे. महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासुन व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम, 2016 कलम 14 मध्ये खालील प्रमाणे नमुद केले आहे.

1.जिल्हाधिकारी यांस किंवा, यथास्थिति जिल्हा दंडाधिकारी यांस, सामाजिक बहिष्कार टाकण्यासाठी बेकायदेशीर सभा बोलविण्याच्या शक्यतेबाबत माहिती मिळेल त्याबाबतीत ते, आदेशाद्वारे त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल. त्याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रांमध्ये कोणताही असा बेकायदेशीर जमाव बोलविण्यास आणि कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाखालील कोणतेही अपराधाचे कोणतेही असे कृत्य करण्यास मनाई करील. 

2. जिल्हाधिकारी यांस किंवा यथास्थिति जिल्हादंडाधिकारी यांस, पोलीस प्राधिका-यांना योग्य निर्देश देण्यासह अशा आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांस आवश्यक वाटेल अशी उपाययोजना करता येईल, असे नमूद आहे. तरी अर्जदार यांच्या अर्जकामी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासुन व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम 2016 मधील कलम 14 प्रमाणे जिल्हाधिकारी किंवा जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त असलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांच्या वतीने प्रकरणी पुढील न्यायोचीत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार यांस अवगत करून तसा अहवाल या कार्यालयात सादर करावा.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या