संयुक्त किसान मोर्चाकडून २५ सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक

संयुक्त किसान मोर्चाकडून २५ सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख भूमिका निभावणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडून आता भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनास दहा महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
हरियाणामधील नूंह येथे किसान महासभेच्या पत्रकारपरिषदेत बोलताना, संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल सिंह यांनी दक्षिण हरियाणा-मेवात येथील शेतकऱ्यांना दिल्ली ठप्प करण्यासाठी तयार राहण्याचे आव्हान केले.
“संयुक्त किसान मोर्चा लवकरच दिल्लीला पूर्णपणे घेरण्याची हाक देईल. दक्षिण हरियाणा अजूनही व्यापने शिल्लक आहे, आम्ही लवकरच आम्ही हाक देऊ” असं यावेळी दर्शन पाल सिंह म्हणाले. तसेच, “आम्ही ५ सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर महापंचायतीमध्ये ‘मिशन यूपी’ची घोषणा करू,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी संयुक्त किसान मोर्चाने प्रत्येक तहसील व गावात शाखा उघडली जाईल, असेही सांगितले.
शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले की, “५ सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर महापंचायत देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक परीक्षा असेल.” तसेच, त्यांनी मेवातच्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशला पोहचण्याची विनंती केली आणि सर्व व्यवस्था केली जाईल असेही सांगितले.
कृषी कायदे: “दोन आठवड्यात आंदोलनावर तोडगा काढा”; सुप्रीम कोर्टाची सरकारला ताकीद
कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं वाहतूक कोंडीवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी सरकारला तोडगा काढावा लागेल. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र वाहतूक कोंडी करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारनं यावर दोन आठवड्यात तोडगा काढावा, अशी ताकीद सुप्रीम कोर्टाने दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा