राज्यात स्व. राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार देणार; महाविकास आघाडी सरकारची घोषणा



राज्यात स्व. राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार देणार; महाविकास आघाडी सरकारची घोषणा


 देशात खेलरत्न पुरस्काराच्या नावावरून वाद सुरु असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं राजीव गांधी यांच्या नावाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी म्हणजेच २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.“माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजी यांच्या नावाने आगामी वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाणार आहे.हा पुरस्कार स्वर्गीय श्री. राजीव जी यांच्या भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी कायमस्वरूपी आदरांजली असेल.”, असं ट्वीट सजेज पाटील यांनी केलं आहे.राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय ७ जुलै २०२१ रोजी घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक

५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256




Comments