भाजपा नेत्याच्या भावाकडून राष्ट्रीय खेळाडूला भररस्त्यात मारहाण, पुण्यातील संतापजनक प्रकार
भाजपा नेत्याच्या भावाकडून राष्ट्रीय खेळाडूला भररस्त्यात मारहाण, पुण्यातील संतापजनक प्रकार
पुणे: टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना सध्या सर्व देश पाठिंबा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यामध्ये आघाडीवर आहेत. त्याचवेळी मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराच्या भावावर राष्ट्रीय खेळाडूला भर रस्त्यात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील फातिमानगर भागात हा संतापजनक प्रकार घडला आहे.
काय आहे प्रकरण?
प्रकरणातील आरोपीचे नाव सुमीत टिळेकर (Sumit Tilekar) आहे. तो भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचा चुलत भाऊ आहे. फातिमा नगर भागातील सिग्नलवर गाडी पुढे नेण्याच्या वादावरुन टिळेकर आणि महाराष्ट्राची ज्यूडो रेसलिंग खेळाडू वैभवी गणेश ठुबे यांच्यात वाद झाला. या वादानंतर टिळेकर त्यांच्या BMW गाडीतून उतरला आणि त्याने वैभवीला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये तिच्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झालं आहे.
पोलिसांची हाराकिरी
या प्रकरणात टिळेकरने जबर मारहाण केल्यानंतरही वानवडी पोलिसांनी सुरुवातीला किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे टिळेकरची तात्काळ जामीनावर सुटका झाली. त्यानंतर पोलिसांनी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील भर रस्त्यात महिलेला झालेली ही मारहाण अतिशय गंभीर आहे. या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मनसेनं केली आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment