पाऊस दोन दिवसांत परतणार कोकणासह मुंबईसाठी हवामान विभागाचा अंदाज

पाऊस दोन दिवसांत परतणार कोकणासह मुंबईसाठी हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणाकडे पाठ फिरवलेला पाऊस १३ ऑगस्टपासून पुन्हा सक्रिय होणार असून त्यानंतर २० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.ऑगस्टच्या प्रारंभापासूनच मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली. कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमानही वाढले आहे. मुंबई उपनगरात बुधवारी २६.५ अंश सेल्सिअस किमान, तर ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. दोन्हींमध्ये सरासरीच्या तुलनेत २ अंशांची वाढ दिसून आली. मुंबई शहर भागात आणि रत्नागिरी येथेही कमाल तापमानात २ अंशांची वाढ झाली
.अंदाज काय?
जून व जुलै या सलग दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. ऑगस्टचे दहा दिवस कोरडे गेले असतानाच पाऊस पुन्हा परतण्याची आशा निर्माण झाली आहे. १३ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सुरू होणार असून २० ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ये यांनी सांगितले.
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा