महिन्याभरात ७०० बालके बाधित

 


महिन्याभरात ७०० बालके बाधित

महिन्याभरात ७०० बालके बाधित

निर्बंध शिथिल केल्यावर बालकांसह घरातील व्यक्ती घराबाहेर पडू लागल्या आहेत


मुंबई : शहरातील रुग्णसंख्या काही अंशी वाढली असून गेल्या महिनाभरात १० ते १९ वयोगटातील ५३५ आणि १० वर्षांखालील दोनशे बालके बाधित झाल्याचे आढळले आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून सर्वाधिक ११४० रुग्ण ३० ते ४० वयोगटातील आहेत.

गेल्या आठवडय़ात बालकांच्या दोन संस्थांमध्ये जवळपास ३६ बालके बाधित आढळल्यानंतर बालकांमधील करोनाचे प्रमाण वाढत आहे अशा चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. मुंबईत ३० जुलै ते २८ ऑगस्ट या काळात ४२१९ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. २० ते ३०(८७६), ४० ते ५०(७९२), ५० ते ६०(७६४) आणि ६० ते ७०(६८२) या वयोगटात रुग्ण आढळले आहेत. त्या तुलनेत बालकांचे प्रमाण मात्र कमी आहे. दहा वर्षांखालील २०२ बालके आणि १० ते १९ वयोगटातील ५३५ बालकांना करोनाची बाधा झाली आहे. बाधितांपैकी बहुतांश बालके ही लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे आहेत. तसेच बालकांमध्ये एकही मृत्यू झाल्याचे आढळलेले नाही.

निर्बंध शिथिल केल्यावर बालकांसह घरातील व्यक्ती घराबाहेर पडू लागल्या आहेत. त्यामुळे गर्दी वाढली आहे. परंतु अजून तरी बालकांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे पालकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये आणि करोना प्रतिबंधात्मक उपयांचे पालन काटेकोरपणे करावे, असे मत डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केले.

पालिकेच्या मोठय़ा करोना केंद्रामध्ये बालकांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला असून अतिदक्षता विभागही कार्यरत केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या