कृषी संशोधक, पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांचे निधन

कृषी संशोधक, पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांचे निधन
आफ्रिकेतील बोअर शेळीपासून नवीन संकरीत जात त्यांच्या संशोधनातून विकसित झाली.
कराड : फलटणमधील प्रसिद्ध निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ूटचे संस्थापक, जुन्या पिढीतील शेती, बियाणे आणि शेळींच्या नव्या संकर जाती यामधील संशोधक, पद्मश्री बनबिहारी विष्णू निंबकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. फलटण येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मागे पत्नी, नंदिनी, मंजिरी व चंदा या तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
गोव्यामध्ये १७ जुलै १९३१ रोजी जन्मलेल्या बनबिहारी निंबकर यांनी १९५६ मध्ये फलटणमध्ये शेती, बियांणात संशोधन करून, ‘निंबकर सीड्स’ या नावाने आपली बियाणे बाजारात आणली. त्यांची निंबकर कापूस बियाणे सर्वदूर नावलौकि कास होते. निंबकर यांनी १९६८ साली फलटण येथेच ‘नारी’ अर्थात निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिस्टय़ूटची सुरुवात करून, त्यामाध्यमातून शेती, बियाणे आणि शेळी, मेंढी पालन व्यवसायामध्ये विपुल संशोधन केले. आफ्रिकेतील बोअर शेळीपासून नवीन संकरीत जात त्यांच्या संशोधनातून विकसित झाली. या शेळीची गतीने वाढ होऊन तिला जुळेही होण्याचे प्रमाण मोठे राहिल्याने त्यातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळत गेले. बी. व्ही. निंबकर म्हणून सर्वदूर परिचित असणाऱ्या या शेतीविषयक संशोधकाला व त्यांच्या संस्थेला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयही पुरस्कार लाभले. केंद्र शासनाने २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. जमनालाल बजाज पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला होता.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment