प्रभू श्रीराम यांच्याशिवाय अयोध्या काहीच नाही: राष्ट्रपती कोविंद

 

प्रभू श्रीराम यांच्याशिवाय अयोध्या काहीच नाही: राष्ट्रपती कोविंद

प्रभू श्रीराम यांच्याशिवाय अयोध्या काहीच नाही: राष्ट्रपती कोविंद


अयोध्या प्रभू श्रीरामांशिवाय काहीच नाही, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी म्हणाले. कोविंद यांनी राम मंदिराचं निर्माण सुरू असलेल्या अयोध्या शहराला भेट दिली. “श्रीरामांशिवाय अयोध्या अयोध्या नाही. राम आहे त्यामुळे अयोध्या अस्तित्वात आहे. प्रभू राम या शहरात कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत, आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ही जागा अयोध्या आहे,” असं वक्तव्य रामायण संमेलनाचे उद्घाटन करताना राष्ट्रपतींनी केलं.

स्वतःच्या नावाचा उल्लेख करताना कोविंद म्हणाले, “मला वाटते की जेव्हा माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझे नाव ठेवले, तेव्हा सर्वसामान्य लोकांप्रमाणेच त्यांच्याही मनात राम कथा आणि भगवान राम यांच्याबद्दल आदर आणि आपुलकीची भावना होती.” अयोध्याबद्दल अधिक बोलताना राष्ट्रपती म्हणाले, “की अयोध्या शब्दाचा अर्थ ज्याच्याशी युद्ध करणे अशक्य आहे, असा होतो. रघुवंशीय राजे रघु, दिलीप, अज, दशरथ आणि राम यांच्या धैर्यामुळे आणि सामर्थ्यामुळे त्यांची राजधानी अजिंक्य मानली गेली. त्यामुळे या शहराचे ‘अयोध्या’ हे नाव नेहमी आदराने घेतले जाईल.”

भगवान राम यांच्या आदिवासींवरील प्रेमाबद्दल सांगताना ते म्हणाले, “वनवासात असताना, रामाने अयोध्या आणि मिथिलाच्या सैन्याला युद्ध लढण्यासाठी बोलावले नाही. त्याने कोल, भील, वानर यांना एकत्र आणले आणि आपले सैन्य तयार केले. त्याच्या मोहिमेत त्यांनी जटायूंचा (गिधाड) समावेश केला. त्यांनी आदिवासींसोबत प्रेम आणि मैत्री दृढ केली.”

या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा, आणि केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना विक्रम जर्दोष उपस्थित होते.


....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या