रंगकर्मीच्या आंदोलनाला यश

रंगकर्मीच्या आंदोलनाला यश
मुंबई : अस्वस्थ रंगकर्मीनी क्रांतिदिनाचे औचित्य साधून केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. मंगळवारी निवडक रंगकर्मीची सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक झाली. ज्यामध्ये रंगकर्मीच्या बहुतांशी मागण्या मान्यकरोनाकाळात रंगभूमीला लागलेले टाळे अद्याप उघडले नसल्याने अडचणीत आलेल्या रंगकर्मीनी आपल्या वेदना ९ ऑगस्ट रोजी आंदोलनातून मांडल्या. जवळपास १ हजारहून अधिक रंगकर्मी हिंदमाता येथील दादासाहेब फाळके स्मारकाजवळ जमले होते. सांस्कृतिकमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेत रंगकर्मीना बैठकीचे आमंत्रण दिले होते. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या या बैठकीत करोनाकाळातील आणि कायमस्वरूपी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.‘दोन ते तीन व्यक्तीत सादर केल्या जाणाऱ्या लोककलांच्या परवानगीसाठी सांस्कृतिकमंत्र्यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तात्काळ बैठक आयोजित के ली. ज्या जिल्ह्य़ामध्ये शिथिलता आहे तिथे गर्दी न करता या कला सादर करण्यासाठी मुभा देण्याची तयारी या वेळी वडेट्टीवार यांनी दर्शवली. आर्थिक अडचणीमुळे ज्या रंगकर्मीच्या मुलांचे शिक्षण थांबले आहे, ज्यांना घरभाडे, वीज देयक भरणे शक्य नाही अशा रंगकर्मीची यादी करून ती शासनाला सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती अभिनेते विजय पाटकर यांनी दिली.महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेल्या रंगकर्मीची लवकरच ऑनलाइन माध्यमातून शासनदरबारी नोंद होईल, कलाकारांना निर्वाह निधीसाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अटीमध्ये बदल करण्यात येईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. तसेच नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे १ सप्टेंबपर्यंत सुरू होतील असे सूतोवाचही केले. तर माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर ‘रंगकर्मी बोर्डा’ची स्थापना आणि निराधार, वयोवृद्ध रंगकर्मीची वृद्धाश्रमात शासनाच्या वतीने व्यवस्था या मागण्यांबाबत लवकरच कार्यवाही होणार आहे.
तत्त्वत: मान्यता
* रंगकर्मीसाठी ‘रंगकर्मी रोजगार हमी योजना’ लागू करावी.
* शासनातर्फे रंगकर्मीसाठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडकोच्या घरांसाठीच्या संख्येत ५% वाढ करावी.
विचाराधीन मागण्या
* रंगकर्मीना रेल्वे प्रवासाची मुभा
* मुंबईत किंवा जिल्ह्य़ाच्या ठिकाणी सादरीकरणाला गेलेल्या कलाकारांची शासनाच्या निवासी गाळ्यात किंवा वसतिगृहात सवलतीच्या दरात व्यवस्था.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
....................................
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment